जमीन मोजणीसाठी अर्ज कोठे करावा
आपणास आपली जमीन मोजणी साठी अर्ज करायचा असेल, तर तूम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयात मोजणी करून देण्यासंबंधित अर्ज सर्व शेत जमिनीच्या कागदपत्रांसह सादर करावा लागेल. तसेच कुठली मोजणी करावयाची आहे त्या संबंधित कागदपत्रे जोडावीत जसे की
जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे
१) चालु ७/१२ उतारा तलाठी यांचेकडील,
२)१०० रूपयांचे स्टॅम्प पेपरवर जमिनीचे मालकी हक्का बाबत कुठलाही दावा कुठलेही न्यायालयात चालु / प्रलंबित नसलेबाबत प्रतिज्ञापत्र व जमिन सरकारी देवस्थान मालकी ईनामी नसलेबाबत प्रतिज्ञापत्रात नमुद करणे. व जागेवर प्रत्यक्ष ताबा असलेबाबत देखील नमुद करणे.
३)ज्या जमिनीची मोजणी करावयाची आहे त्या जमिनीचा कच्चा बिनस्केली नकाशा....
४) रहिवासी पुरावा व ७/१२ उतारावरील नमुद सर्व सह हिस्सा धारकांचे आधारकार्ड व पत्रव्यवहाराचा पत्ता.
५) मोजणी फी चलन भरलेबाबतचे मुळ चलन व झेराक्स,
मोजणी प्रक्रिया -
अर्जदाराकडून जमीन मोजणी संदर्भाचा अर्ज भूमी अभिलेख कार्यालयामध्ये प्राप्त झाल्यानंतर मोजणी रजिस्टरवर त्याची नोंद करून त्या अर्जाला एक क्रमांक दिला जातो. त्यानंतर कार्यालयीन कार्यवाही पार पडल्यानंतर नंतर संपूर्ण फाईल मोजणी करणाऱ्या सर्वेअर कडे दिली जाते.
हा सर्वेअर अर्ज करणाऱ्या व्यक्ती सह त्याच्या जमिनीच्या चारही बाजूंनी असणाऱ्या शेजार्याना मोजणीच्या १५ दिवस अगोदर नोटीस पाठवून मोजणीची तारीख कळवली जाते.
आज-काल सर्व जमिनीच्या मोजणी या प्लेन टेबल पद्धतीचा उपयोग करून केल्या जातात.
जमीन खालवर असल्यास किंवा ओढ्या नाल्याची असल्यास तिचे आकारमान प्लेन टेबल पद्धतीने अचूक काढले जाते.
मोजणीच्या दिवशी एखादा शेजारील शेतकरी व्यक्ती जर गैरहजर राहिला, तर त्या व्यक्तीच्या गैरहजेरी मध्ये देखील मोजणी करता येते. मात्र मोजणी ज्या दिवशी करण्यात येणार आहे, त्या बाबतची नोटीस त्या शेतकऱ्यांस दिली गेली असणे गरजेचे आहे ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे,
जमीन मोजणीचे प्रकार व कालावधी -
मोजणीचे साधी, तातडीची व अति तातडीची व अतिअतितातडीची मोजणी असे प्रकार असतात व त्यानुसारच मोजणी फी ठरते.
साधारणतः
साधी मोजणी १८० दिवसांत,
तातडीची मोजणी १२० दिवसात तर
अति तातडीची मोजणी ६० दिवसात तर
अति अति तातडीची मोजणी ही १० दिवसात केली जाते.
मोजणीचे वेळी स्वतः किवा प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहावे, मोजणीसाठी आवश्यक सामग्री व वस्तू जमविणे व मोजणीसाठी मदत करणे हे आजूबाजूचे सर्व शेत जमीन धारकांचे कर्तव्य आहे. मोजणी करताना संपूर्ण गटाची व सर्व्हे नंबरची मोजणी करावी,
मोजणी प्रतिक्षा यादी येथे पाहावी
☝☝☝
जमीन मोजणीचे मुख्य प्रकार व कारणे -
(१) हद्द कायम मोजणी
(२) निमताना मोजणी
(३) पोटहिस्सा मोजणी
(४) भूसंपादन संयुक्त मोजणी
(५) कोर्टवाटप मोजणी
(६) कोर्टकमिशन मोजणी
(७) बिनशेती मोजणी
(८) सुपर निमताना मोजणी
असे प्रमुख प्रकार आहेत.
मोजणी मान्य नसेल तर काय करावे-
जमिन मोजणीचे अपील
पहिले अपील -
जमिन मोजणी झाली आणि सर्वेअर यांनी हद्दीच्या खुणा दाखवल्या माञ अशी मोजणी आपल्याला किंवा शेजारील शेतकऱ्यांना मान्य नसेल तर त्याविरुद्ध अपील दाखल करता येते. असे अपील आपण तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांचे कडे दाखल करू शकतो आणि त्यानंतर तालुका निरीक्षक यांचे तर्फे ही मोजणी केली जाते आणि त्यास निमताना मोजणी असे म्हणतात.
दुसरे अपील -
जर निमताना मोजणी केल्यानंतर आपल्याला निमताना मोजणी मान्य नसेल. तर त्या मोजणीवर देखील अपील केले जाते असे अपील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे केले जाते त्यास सुपर निमताना मोजणी असे म्हणतात.
👇👇👇
मोजणी प्रतिक्षा यादी, मोजणी नकाशा, मोजणी अर्ज, मोजणी, मोजणी मान्य नसेल तर काय करावे, मोजणी फी, मोजणी अँप, मोजणी अर्ज pdf, मोजणी समानार्थी शब्द मराठी, मोजणी meaning in english, मोजणी अर्ज, मोजणी प्रतिक्षा यादी, जमीन मोजणी अर्ज नमुना pdf, जमीन मोजणी कायदा, जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे, सरकारी मोजणी, कोर्ट कमिशन मोजणी प्रोसेस,जमीन मोजणी सूत्र, मोजणी नकाशा, जमीन मोजणी फी,ई-मोजणी, जमीन मोजणी अर्ज नमुना
जमिनीची मोजणी करणार असाल तर नक्की वाचा | If you are going to measure land, be sure to read this.
Reviewed by Legal Help in Marathi
on
मार्च २६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा